मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाच्या मेहकर आगारांमध्ये सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचि विशेष मीटिंग घेण्यात आली आणि याच मीटिंगमध्ये मेहकर आगारातील 30 कर्मचाऱ्यांनी सेवाशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला.
सविस्तर असे की राज्य परिवहन महामंडळाची सेवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर तसेच कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत,सरचिटणीस सतीश दादा मेटकरी,त्यांची संपूर्ण टीम यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून तसेच बुलढाणा विभागीय अध्यक्ष शिवाजी आनंदे,कार्याध्यक्ष सतीश पाटील तेजनकर,सचिव सुनील पाटील यांच्या बुलढाणा विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या कामाची पावती म्हणून मेहकर आगारातील 30 कर्मचाऱ्यांनी आज सेवाशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला आणि संघटना वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही यापुढे सदैव सेवाशक्ती संघटने सोबदच सोबतच राहू असे आश्वासन दिले.यामध्ये प्रामुख्याने नव्याने प्रवेश करणारे कर्मचारी म्हणजे एम.डी.चोपडे,गजानन आघाव,डी.जि.पवार,अरुण आघाव,गोपाल डागर,परमेश्वर राजगुरू,खुशालराव आनंदराव,अंकुश शिंदे,कृष्णा मगर,सुरेश राठोड,आर.डी. शिनगारे,विनोद देवकर,संतोष येळवंडे,दत्तात्रय मोरे,ज्ञानेश्वर राजगुरू,कैलास देशमुख यांच्यासह बरेच कर्मचारी संघटनेमध्ये प्रवेश करून सामील झाले आहे.
तसेच सदर कार्यक्रमामध्ये शिवाजी आनंदे यांची प्रादेशिक अध्यक्ष झाल्याबद्दल तर सुनील पाटील यांचि केंद्रीय सहसचिव झाल्याबद्दल मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांच्या भव्य दिव्य शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि यावेळी आगार सचिव म्हणून प्रताप राजगुरू यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात येऊन सर्व उपस्थितांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व वरिष्ठांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून खामगाव आकाराचे अध्यक्ष गणेश जाधव,विभागीय उपाध्यक्ष प्रमोद तायडे व रवींद्र खेडकर यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाला मेहकर आगारामध्ये मिशन टायगर असे नाव देण्यात आले असून हे मिशन टायगर यशस्वी करण्यासाठी विभागीय कार्याध्यक्ष सतीश पाटील तेजनकर तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल पाटील पाचपोर,छगन मुळे,गणेश मोसंबे,आगार अध्यक्ष तेजराव तेजनकर,सचिव गजानन धोटे,नवनिर्वाचित सचिव प्रताप राजगुरू यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी पदाधिकारी व विजू नवले,विजू सनांसे,मेकॅनिक सानप,पंकज खोडके,लक्ष्मण मोरे,नारायण साबळे,जी.के. कुमरे,आण्णा राजगुरू,भगवान सुरूशे,एल.सी.मोरे,आर.एस. डवळे,नागसेन आनंदराव,गजानन कांबळे,राजेभाऊ तळेकर,यांच्यासह बऱ्याच कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमामध्ये एम.डी. चोपडे,अरुण आघाव,लक्ष्मण मोरे,तेजराव तेजनकर,गजानन धोटे,सुनील पाटील,शिवाजी आनंदे,यांनी आपले मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या आणि संघटनेच्या प्रति असलेले संबंध सांगितले तर सतीश पाटील तेजनकर यांनी सूत्रसंचालन केले आणि छगन मुळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment
0 Comments