Type Here to Get Search Results !

कर्जाच्या विळख्यात एका बळीराजाचा बळी,केशव शिवणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या


सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय ४५) यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुःखद घटना समोर आली आहे.


मृत शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याचे सांगत, कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments