मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली आहे. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयात ११ जुन रोजी ५ प्रभागातील १३ सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण जाहीर करण्यात आले.
शेलगाव देशमुख ग्रामपंचायतचे एकूण ५ प्रभाग १३ सदस्य आहेत . यामध्ये प्रभात १ मध्ये ३ सदस्य असणाऱ्या प्रभागात नागरिकांचा मागासप्रवर्ग स्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. तर प्रभाग २ मध्ये ३ सदस्य असणाऱ्या प्रभागात नागरिकांचा मागासप्रवर्ग,सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण तर प्रभाग ३ मध्ये ३ सदस्य असणाऱ्या प्रभागात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्री, सर्वसाधारण स्त्री. प्रभाग ४ मध्ये २ सदस्य असणाऱ्या प्रभागात अनुसूचित जाती स्त्री, व सर्वसाधारण तर प्रभाग ५ मध्ये २ सदस्य असणाऱ्या प्रभागात नागरिकांचा मागासप्रवर्ग, व सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी मंडळ अधिकारी रामराव चनखोरे, सरपंच पती दिलीप आखरे,ग्राम महसूल अधिकारी बालाजी तिरके, ग्रामपंचायत अधिकारी दिपक काळे, महसूल सेवक भगवान बघे, ग्रामपंचायत लिपिक महादेव कड्डक, विलास काळदाते ,गजानन खोडवे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, पोलीस पाटील संतोष सोनुने, तंटामुक्ती अध्यक्ष खंडू सदार, अशोक म्हस्के,एकनाथ खराट,विनोद खंडारे,दशरथ सदार, माजी सरपंच सुनील देशमुख ,माजी उपसरपंच विलास कड्डक, नारायण खोडवे,मदन काळदाते,सुखदेव खंडारे यांच्यासह गावातील ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments