सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी आजही त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसान मान्य केले असताना पीक विम्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, सिंदखेडराजा येथून उपविभागीय कार्यालय, सिंदखेडराजा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. झालेल्या बैठकीत प्रत्येक शेतकऱ्याने मोर्चात स्वतः उपस्थित राहून पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत तसेच स्वतंत्र निवेदन प्रशासनाला सादर करावे, असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक निवेदनासोबत पीक विम्याची पावती जोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.मोर्चाचे नियोजन शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांनी केले असून हा लढा प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच मोर्चामध्ये जमा होणाऱ्या प्रत्येक अर्जासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गरज पडल्यास मंत्रालय, मुंबई येथे जाऊनही आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. प्रत्येक शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments