Type Here to Get Search Results !

गुंजखेड येथील दांडीबहाद्दर CHO ची तत्काळ बदली करा : नागवंशी संगपाल पनाड


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या कथित सतत गैरहजेरीमुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप करत नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तक्रार निवेदन सादर केले आहे.आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र गुंजखेड येथे कार्यरत असलेले संबंधित CHO सतत गैरहजर राहत असल्याने शासनाच्या आरोग्य धोरणालाच हरताळ फासला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

“गुंजखेड येथील नागरिकांना तात्काळ नियमित व जबाबदार आरोग्य अधिकारी द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा नागवंशी संघपाल पनाड यांनी प्रशासनाला दिला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार लोणार, गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार, पोलीस निरीक्षक लोणार यांना देण्यात आल्या आहेत.या निवेदनावर नागवंशी संघपाल पनाड, विजय उत्तम पाईक, अनिल बबन वाठोरे, समाधान नामदेव सुलताने, दामोधर सुरूशे, शुद्धोधन सरदार, राजहंस जावळे आणि करण सरदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments