Type Here to Get Search Results !

मदन वामन पातुरकर विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे तर्फे जाहीर करण्यात आलेल्या फेब्रु/ मार्च २०२६ च्या इयत्ता १० वीच्या निकालात डोणगाव. येथील मदन वामन पातुरकर विद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यालयाचा निकाल ९८.६६ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातून कु.वैष्णवी विनोद पिंपरकर या विद्यार्थिनीने ९४.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर संस्कार भारत वाळूकर या विद्यार्थ्याने ९३.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. आणि सूरज देवीदास फलटणकर या विद्यार्थ्याने ९२.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला .विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, सर्व संचालक मंडळ,सर्व सल्लागार मंडळ, प्राचार्य लक्ष्मीकांत शेटे ,माजी प्राचार्य रमेश जाधव,सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments