Type Here to Get Search Results !

गणेश राऊत आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागळातील जनसामान्य लोकांना न्याय देणारे , विधायक पत्रकारिता करणारे गणेश राऊत यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकार उत्कर्ष समितीच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन समाजातील विविध क्षेत्रातील कतुत्ववान व्यक्तीचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके नाटयगुह पनवेल येथे संपन्न झाला. या वेळी पनवेल महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्यान सभापती ममता म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पत्रकार उत्कर्ष समिती महिला प्रदेश अध्यक्ष स्मिता पाटील,उपाध्यक्षा आरती पाटील,सचिव ॲड.दिव्या लोकरे,शिवसेना शिंदे गटाचे नेते परेश पाटील , महानगपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, डॉ अशोक म्हात्रे,डॉ वैभव पाटील व पत्रकार उत्कर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.गणेश राऊत हे मागील पंधरा वर्षापासुन सकारात्मक पत्रकारिता करत असून त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये काम केले आहे.विविध वृत्तपत्रातून त्यांचे लेखही प्रकाशित होतात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या आधी ग्रामगीता साहित्य पुरस्कार , राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार , प्रबोधकार संत नामदेव पुरस्कार , समाजरत्न पुरस्कार , उत्कृष्ट वृत्तसंपादनाचा दै विश्वजगत चा पुरस्कार ,बुलढाणा सुतार समाज एकिकरण समिती , रचियता साहित्य संघ नागपुर, साहित्य जगत मासिक यांनी सन्मानित करण्यात आले आहे . त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल त्यांचे सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments