मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशपातळीवर राबविल्या जाणाऱ्या 'जनगणना २०२७' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 'घर गणना'आणि घरांची यादी तयार करण्याच्या महत्त्वपूर्ण मोहिमेला आजपासून मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सदर गणना मोहीम १६ मे ते १४ जून २०२६ या महिनाभराच्या कालावधीत एकाच वेळी पार पडणार आहे.शेलगाव देशमुख येथे प्रगणकाद्वारे घरगणना सुरू करण्यात आली आहे.यावेळी सरपंच पदी दिलीप आखरे, पर्यवेक्षक संजाब पिसे, विष्णु हांडे,प्रगणक संतोष कुबडे, शैलेश आखाडे,सईदा मॅडम,संजय डोंगरे,महेश नंदकुळे,सुरेश वाघ, अरुण चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments