मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
पांगरखेड येथे 10 एप्रिल रोजी महसूल विभाग तहसील कार्यालय मेहकर यांच्या वतीने महसूल विभागाच्या सर्व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांना जागेवरच निपटारा करण्यासाठी शेलगाव देशमुख महसूल मंडळातील पांगरखेड, विठ्ठलवाडी ,बेलगाव, वरूड ,कणका बुद्रुक, टेंभुर्खेड, जमुना, विश्वी, राजगड ,चिंचाळा या गावातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुधाकर धावडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार विवेक नालट, मंडळ अधिकारी के.बी ईप्पर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे,माजी सरपंच भानुदास अजगर सह आदी उपस्थित होते. यावेळी महसूल विभाग, श्रावण बाळ व संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या योजनेतील प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार विवेक नालट, उपकृषी अधिकारी प्रदीप खंडारे, ग्रामपंचायत अधिकारी सागर काळे, पत्रकार विष्णु आखरे पाटील यांनी विविध योजना बाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्राम महसूल अधिकारी बालाजी तिरके, आर.डी.धावडे, एस.ए. पवार,ए.एल आळणे, जी.एस ढोले, सरपंच धनराज राठोड,ग्रामपंचायत अधिकारी दीपक काळे, कृषी सहाय्यक अधिकारी संजाब पिसे, संजय गांधी विभागाचे प्रकाश मुळे,महसूल सहाय्यक भगवान बघे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन इंगळे,अमोल सरसंडे,विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आपली सेवा केंद्राचे संचालक ,राशन दुकानदार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, नागरिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments