मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या शेलगाव देशमुख येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 एप्रिल रोजी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व शैक्षणिक सत्र सन 2026-27 करिता इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमीद सावकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड,तंटामुक्त समिती अध्यक्ष खंडू सदार, उपसरपंच विनोद गोरे,डॉ गजानन अजगर, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन नरवाडे, गफार शहा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख वसीम, पंकज देशमुख, विष्णू आखरे, भिकाजी हरमकर, विनोद खंडारे, गजानन खोडवे, नारायण खोडवे, गजानन मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशोर भाकडे यांनी केले यावेळी मुख्यध्यापिका अरुणा बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पटसंख्या वाढावी या दृष्टिकोनातून सत्र 2026-27 मध्ये इयत्ता पहिली दाखल पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालका समवेत सत्कार केला तर इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन निरोप समारंभ देण्यात आला जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी या दृष्टिकोनातून शाळेचे शिक्षक किशोर भाकडे, संजय कुबडे,सोनाली मालोदे यांनी शाळेत नाविन्यपूर्ण अप्रतिम उपक्रम राबवत असून यातून पटसंख्या वाढीला चालना मिळत असून आजच्या उपक्रमामुळे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषद शाळेच्या कार्याची स्तुती केली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अरुणा बुट्टे यांनी केले.यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments