लोणार, लोकतंत्र न्यूज
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे वडील स्व ,काळुबा अंबादास लाड यांची 10 एप्रिल रोजी प्राणज्योत माळवली खापरखेड लाड येथील निवासस्थानी काळुबा लाड यांनी वयाच्या 67 व्यावर्षी अखेरचा श्वास घेतला आहे .जीवन जगत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या कार्य पद्धतीने व संपूर्ण आयुष्य हे वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात घालवणारे काळुबा अंबादास लाड यांनी आपला एकुलता एक मुलगा शेतकरी चळवळीसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केला होता. दरम्यान त्यांना पूर्वीपासून फिट या आजाराची लागण होती त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील अपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉक्टर मजिद यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु मागील काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती अधिक ढासाळली व शेवटी 10 एप्रिल रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यावेळी खापरखेड लाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक व शेतकरी महिला व विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

Post a Comment
0 Comments