बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलडाणा येथील सर्पमित्र श्रीराम बळीराम रसाळ यांच्या वन्यजिव संरक्षण व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन सेवा श्री सामाजिक फाउंडेशन पुणे यांचे वतीने राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.सदर पुरस्कार 5 एप्रिल रोजी खडकी पुणे येथे रविद्रनाथ टागोर यांच्या चवथे वंशज असलेल्या डॉ शितल रणधिर ( टागोर )आणि महाराष्ट्र राज्याचे आझाद ग्रुप चे अध्यक्ष भीमाशंकर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम रसाळ यांना माना चा फेटा, प्रशस्ती पत्र तसेच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आहे.

Post a Comment
0 Comments