Type Here to Get Search Results !

चिमुकल्या त्रिशीकाला राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान


बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, अमरावती येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात बुलढाण्याची कन्या कुमारी त्रिशिका स्नेहल व अंकित रसाळ यांची सुकन्या हिला 'राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला. इतक्या लहान वयात राष्ट्रगीत आणि प्रार्थनांमधील तिचे प्रभुत्व पाहून उपस्थित सर्व मान्यवर थक्क झाले त्रिशिकाच्या या यशामागे तिची आजी उषा रसाळ यांची मेहनत व शारदा ज्ञानपीठच्या मुख्याध्यापिका जोस्ना भालचंद्र देशमुख आणि वर्गशिक्षिका मेघा नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती संस्थेच्या अध्यक्ष माधुरी सचिन चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात रसाळ परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Post a Comment

0 Comments