मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर हिंदू संमेलने राबविले जात असून भारत भूमी एकसंघ राहावी या दृष्टीकोनातून हिंदू समाजाचे संघटन काळाची गरज असून आपण आपली कुटुंब व्यवस्था मजबूत करून आपण थोरवीर पुरुषांची साधू संतांचे विचाराची बीजे रुजवणे गरजेचे असून आपली हिंदू संस्कृती ही अनमोल ठेवा असून त्या संस्कृतीचे आपण जतन करण्याकरिता एकसंघ होऊन हिंदू समाज संघटन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलढाणा जिल्हा सहकार्यवाह अंबादास साठे यांनी 3 एप्रिल रोजी शेलगाव देशमुख येथे आयोजित विशाल हिंदू संमेलना मध्ये प्रमुख वक्ते म्हणून केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भागवताचार्य भाऊराव महाराज नवले हे होते तर विशेष अतिथी म्हणून ह.भ.प सत्यनारायण महाराज कष्टे, कृष्णा महाराज गोरे, शिवशाहीर केशव पाटील वाहेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प सत्यनारायण महाराज कष्टे,भागवताचार्य भाऊराव महाराज नवले यांनी विशाल हिंदू संमेलनाला मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या हिंदू समाजामध्ये साधू संतांचे विचारांचा मिळालेला अनमोल ठेवा आपले परम भाग्य असून यासाठी आपण एकसंघ होऊन संस्कृती टिकवली पाहिजे असे मार्गदर्शन केले. यानंतर शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवशाहीर प्रा. केशव पाटील वाहेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाडा गायनाचा कार्यक्रम सादर केला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण प्रसारण मंडळ चिखलीचे संचालक गोपाल बोरा,माधव कड्डक, दत्ता उंडाळ, महेन्द्र दायमा,बबन गोरे, उपसरपंच विनोद गोरे,दत्ता काळे, विलास म्हस्के, गणेश पुंड,दिवाकर शेलगेणवार,ज्ञानेश्वर आखरे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णु आखरे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले.पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments