Type Here to Get Search Results !

सरपंच शंकर गायकवाड यांचा रोजगार हमी भरत गोगावले यांना फोन


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या रोजगार सेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. विहीर बांधकाम, घरकुल योजना, गुरांच्या कोट्याचे वाटप तसेच इतर रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे केवळ विकासकामांनाच अडथळा निर्माण झाला नसून राज्याच्या आर्थिक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे.


या गंभीर परिस्थितीची दखल घेत मेहकर तालुक्यातील बाभुखेड येथील सरपंच शंकर गायकवाड यांनी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना सध्याच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती देत, राज्यातील जनतेवर होणारा परिणाम स्पष्टपणे मांडला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सदर विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.


त्यांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच रोजगार सेवकांच्या प्रश्नावर तोडगा निघेल आणि बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments