Type Here to Get Search Results !

ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन


बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

ग्राम रोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य (मोताळा तालुका) यांच्या वतीने ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. सादर करण्यात आलेल्या या निवेदनात शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, रोजगार सेवकांना अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ सेवेत समाविष्ट करावे, तसेच त्यांना मिळणारे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वैयक्तिक कामांवरील मंजुरी प्रक्रियेत असलेली फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) प्रणाली रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील हजारो ग्राम रोजगार सेवकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन व प्रोत्साहनपर रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोताळा तालुक्यातील रोजगार सेवकही यामुळे प्रभावित झाले आहेत.यावेळी रोजगार सेवक संघटनेचे मोताळा तालुका अध्यक्ष विठ्ठल दिघे, रवी देशमुख, संदीप मापारी, भिमराव खराटे, रामा घडेकर, प्रकाश खर्चे, संदीप सुधाकर लवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे मोताळा तालुका अध्यक्ष प्रवीण (आप्पा) कदम व अमर कुळे उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments