बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्हा ग्रामरोजगार सहायक संघटनेच्या वतीने २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे या निवेदनात दि.३ आक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार ८ हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे या व ईतर विविध मागण्यासाठी ग्राम रोजगार सहायक संघटना व सर्व सामान्य ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वतीने दि. १ एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे व दि.४ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालय पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले आहे.सदर आंदोलनाची दखल घेऊन ग्राम रोजगार सहाय्यकांच्या पुढील मागण्या मंजूर करण्यात याव्या.१) दि ३ आक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ८ हजार रुपये मासिक मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.२) अर्धवेळ चा शासन निर्णय रद्द करुन पुर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा.३) मजूरा प्रमाणे ग्राम रोजगार सहाय्यक यांना मानधन वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे.४) ऑनलाइन कामे करण्यासाठी संगणक (लॅपटॉप) व नेटवर्क साठी डेटा पॅक देण्यात यावा.वरील मागण्या मंजूर कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नेपाल सिंग राजपूत ,जिल्हा सचिव पृथ्वीराज गवई, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावंडे, जिल्हा संघटक संजय मोरे, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष श्रीधर डिगोळे, मनोज सातव, गौतम झनके, भगवान अवसरमोल सह आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments