मेहकर, लोकतंत्र न्यूज
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘गुगल गर्ल’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या कोमल देविदास खनपटे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोमलने अवघ्या १० सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे सांगत India Book of Record मध्ये नोंद करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदनाताई दिपक आखाडे यांच्या हस्ते तिचा सत्कार व मान-सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. सुनिता जुनघरे, डॉ. सारिका मंगेश बाजड, डॉ. प्रांजली बाजड, माजी सरपंच रेखाताई पांडव तसेच अनेक महिला मंडळांच्या सदस्या उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments