मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील मेहकर ते चिखली रोडवरील बाभुळखेळ फाटा येथे ८ मार्च रोजी सकाळी च्या दरम्यान विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला.बाभुळखेडचे सरपंच शंकर गायकवाड सह नागरिकांनी घटनास्थळी दाखल झाले.सदर घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर मृतदेह हा हिवरा आश्रम येथील पोलीस पंजाबराव भीमराव शेळके व 56 वर्षे यांचा असल्याचे समजले या प्रकरणी अमोल सिताराम मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश काळे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments