Type Here to Get Search Results !

शेंदला येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

महसूल विभागाच्या सर्व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी मोजे शेंदला येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक 7/3/ 2026 शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले यासाठी उपस्थित मान्यवरांचे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर नायब तहसीलदार विवेक नालट साहेब यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी श्याम सोळंके यांनी केले यानंतर बी डी ओ खरात साहेब,, पोस्ट डिपार्टमेंटचे शुक्ला,, वित्त विभाग गावंडे ,, यांनी मार्गदर्शन केले यानंतर विद्यमान आमदार श्री सिद्धार्थ जी खरात साहेब यांनी कार्यक्रमाला भे उपस्थिती लावून उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ग्रामपंचायत शेंदला मार्फत विवाह नोंदणी सर्टिफिकेट, जन्ममृत्यू दाखले, तसेच महसूल विभागामार्फत जातीची दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड, नॉन क्रिमिनल दाखले, आदिवासी बांधवांना उत्पन्नाची दाखले, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थ्यांना मंजुरी आदेश तसेच कृषी विभागामार्फत रोटावेटर चे मंजुरी आदेश व विविधतेचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व गीत गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा मतदार यादी शुद्धीकरण बाबत सविस्तर माहिती बोराडे सर यांनी दिली यानंतर आमदार साहेब व विविध मान्यवरांनी तेथे उभारलेल्या विविध प्रकारचे स्टॉल जसे शाळेतर्फे रांगोळी स्पर्धेच्या आयोजन, अंगणवाडी सेवेकीमार्फत लावलेले स्टॉल, माती परीक्षण विभाग ,आरोग्य विभाग ,कृषी विभाग ,संजय गांधी निराधार विभाग ,पुरवठा विभाग ,पी एम किसान विभाग, आधार अपडेट, पोस्ट विभाग, वित्त विभाग इत्यादी स्टॉलला भेटी दिल्या व सूचना दिल्या समाधान व्यक्त केले या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी काळे साहेब बी डी ओ खरात साहेब नायब तहसीलदार विवेक नालट , निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर , विस्तार अधिकारी पंडागळे , मेटांगळे आणि मोजे शेंदला येथील आजी-माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व नायगाव मंडळातील सर्व गावाच ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासक , ग्राम महसूल अधिकारी , अंगणवाडी सेविका , मदतनीस ,आशा वर्कर ,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद ,कृषी सहाय्यक, आजी आणि माजी सरपंच ,उपसरपंच ,पोलीस पाटील ,बीएलओ ,ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, सेतू चालक, महसूल सेवक, बँक पोस्ट कर्मचारी, स्वस्त आणि दु,कानदार, आधार केंद्र चालक सरोदे सायगाव यांनी उपस्थितराहून सहकार्य केले सदर शिबिरास माजी आमदार डॉ संजयजी रायमुलकर उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी नायब तहसीलदार नितीन बोरकर प्रवीण देशमुख जाधव साहेब मंडळ अधिकारी ढोके महाजन मेंटेगळे यांनी भेटी दिल्या साखरखेडरा येथील कलावंतांनी संस्कृती कार्यक्रम सादर केला कार्यक्रमा चे संचालन कृषी सहाय्यक अंभोरे मॅडम आणि सेतू चालक भुसारी व आभार प्रदर्शन इंगळे ग्राम महसूल अधिकारी शेंदला यांनी केले.

Post a Comment

0 Comments