शेलगाव देशमुख, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे ८ मार्च रोजी विठ्ठल रुक्माई शिक्षण प्रसारक संस्था डोणगाव द्वारा संचालित श्री विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सत्कार सोहळ्याचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप लांभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पल्लवी विनोद गोरे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून कल्पना कड्डक, लक्ष्मी मोसंबे, वैशाली खरात, सुनिता बुळे, राधिका कड्डक, पूजा कड्डक आधी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या. उपस्थित महिलांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री विठ्ठल रुखमाई विद्यालयातील विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले आजच्या विज्ञान युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून विविध पदावर कार्यरत असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून आपण सुद्धा निसंकोच होऊन प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावं तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महिला दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित महिलांचा जागतिक महिला दिनाच्या औचित सादत महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप लांभाडे यांच्यासह सहाय्यक शिक्षक सुरेश वाघ ,राम जटाळे, अरुण चव्हाण, अमोल लोकडे ,उपसरपंच विनोद गोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments