मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर शहराचे बाहेर खामखेड रोडवरील MIDC परिसराचे शेतात एक पुरुष जातीचे प्रेत पडलेले आहे अशी माहिती मिळाल्यावरुन मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार तसेच त्यांचे सहकारी पोलीस स्टापसह घटनास्थळी पाहणी केली असता सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचे प्रथमदर्शरी निदर्शनास आले. त्यामुळे मेहकर पोलीसांनी सदर मृतक याची ओळख पटवीली असता सदर मृतक याचे नांव राहुल भानुदास बाजड वय 28 वर्ष रा. जांब आढाव ता. रिसोड जिल्हा वाशिम असे असल्याबाबत निष्पन्न झाल्याने पोलीसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा कार्यवाही करुन घटनास्थळावर फॉरेन्सीक लॅब, फिंगरप्रिंट, तसेच डॉग स्कॉड यांना त्वरीत पाचारण करुन सदर खुनाचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने चार पोलीस पथके तयार करुन रवाना करण्यात आले. तसेच घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी देखील घटनास्ळावर भेट देऊन तपासावाबत मार्गदर्शन केले.
सदर घटनेबाबत पोलीस तपासाची सूत्रे अतिवेगवान करुन सदर प्रकरणात गोपणीय माहिती आणि तांत्रीक विश्लेषणाची मदत घेऊन केनवड ता. रिसोड जि. वाशिम येथुन सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे ओम शामराव केनवडकर वय 36 वर्ष रा. केनवड ता. रिसोड जि.वाशिम यास त्याचे मालकीचे शेतातुन ताब्यात घेऊन त्यास सदर प्रकरणाबाबत विश्वासात घेऊन कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता सदर आरोपींनी कबुली दिली की, मृत्तक हा मागील काही दिवसांपासुन त्यांचे पत्नीस वारंवार त्रास देत होता. सदर बाबत मृतक पास वेळोवेळी समजावुन सांगुन देखील तो समजत नसल्याने काल दि.03/03/2026 रोजी मृतक यास मेहकर येथील खामखेड रोडवरील MIDC परिसराचे शेतात नेऊन दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केल्याचे कबुली दिलेली आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी नामे संजय किसन वाघ वय 40 वर्ष रा.जांब आढाव ता. रिसोड जि. वाशीम यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन मेहकर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर प्रकरणात निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा, प्रदीप पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, सपोनि. अशोक अवचार, पोउपनि गणेश कड, पोउपनि कांचन जारवाल, सफौ. सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, पोहेकों, लक्ष्मण कटक, सुखदेव ठाकरे, संजय पवार, प्रभाकर शिवणकर, पोकॉ. मोहम्मद परसुवाले, विलास झोटे, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले, करिम शहा, शिवानंद तांबेकर, विठठल पैठणे, गजानन लहाने, अशोक घोगे, सुनिल देशमुख, विनोद पवार, संदीप भोंडाणे, शिवाजी चिम, मपोकों, आम्रपाली सरकटे पोलीस स्टेशन मेहकर तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोकॉ. कैलास ठोबरे आणि मपोकों, उषा वाघ यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी मोलाची कामगीरी बजावली आहे.

Post a Comment
0 Comments