Type Here to Get Search Results !

बार्टी संस्थेच्या प्रभारी महासंचालक पदी दिपा मुधोळ - मुंडे


पुणे, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या प्रभारी महासंचालक पदाचा पदभार श्रीमती दिपा मुधोळ - मुंडे (भा.प्र.से) यांनी स्विकारला आहे.

बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे यांची बदली महाराष्ट्र शासनाने प्रतिनियुक्तीने व्यवस्थापकीय संचालक, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई या पदावर नियुक्ती केल्याने बार्टी महासंचालक या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार समाजकल्याणच्या आयुक्त श्रीमती दिपा मुधोळ - मुंडे (भा.प‌‌‌.से) यांच्याकडे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सोपविण्यात आला.श्रीमती दिपा मुधोळ - मुंडे यांनी बार्टी महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी बार्टी पुणे मुख्यालयात स्विकारला.यावेळी बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.

यावेळी विभागप्रमुख रविंद्र कदम, शुभांगी पाटील, डॉ. बबन जोगदंड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments