Type Here to Get Search Results !

शेलगाव देशमुख येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

 


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे 18 मार्च रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव व बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवयुवक शिवभक्तांनी शेलगाव देशमुख येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव व जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 7 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले यावेळी सरपंच पदी दिलीप आखरे, युवासेना उपतालुकाप्रमुख एकनाथ खराट, माजी सैनिक तातेराव गरड,दिपक सदार,शरद केळे,विनोद ताकतोडे,विलास म्हस्के, राजेश ताकतोडे,पियुष केळे,भुषण उगले,उत्तम आखरे, संतोष पोफळे,राजेश पोफळे,सागर आखरे,मोहण बुळे सह छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप, छत्रपती संभाजी राजे ग्रुप ,शिवभक्त, जेष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments