मेहकर,लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील पत्रकार विष्णु आखरे पाटील यांच्या घरी बांधकाम चालू असताना साप आढळून आला साप दिसतात सर्पमित्र शेख रेहान शेख इस्माईल यांना माहिती दिली असता सर्पमित्र शेख रेहान शेख इस्माईल घटनास्थळी दाखल झाले व पत्रकार विष्णू आखरे पाटील यांच्या घरासमोरील सापाला पकडून भरणी बंद केले व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सापाला पकडून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल पत्रकार विष्णू आखरे पाटील व परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र शेख रेहान यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments