मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते संपतराव देशमुख यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वसंतराव देशमुख, ग्रामपंचायतचे सरपंचपती दिलीप आखरे, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते गफ्फार शहा शहीन शहा, पत्रकार विष्णु आखरे पाटील,शेख हबीब यांच्या उपस्थित ग्रामपंचायतचे कर्मचारी गजानन खोडवे, सीएसी सेंटर चालक वैभव पातुरकर व फोटोग्राफर लक्ष्मण तोतरे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शिक्षक किशोर भाकडे , पत्रकार विष्णु आखरे पाटील व काँग्रेसचे नेते वसंतराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक कुबडे, किशोर भाकडे, शिक्षिका सोनाली माळवदे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments