लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सलग पाचव्या वर्षी मिसेस लोणार आणि मिस लोणार कार्यक्रम दिनांक 12 मार्च गुरुवार रोजी जल्लोषात पार पडला या वर्षी चे मुख्य आकर्षण होते. लकी ड्रा आणि मनोरंजक खेळ सोबतच विशेष हे भव्य असा नारिशक्ती चा सन्मान सह सत्कार सर्व प्रथम नारिशक्ती च्या सदस्या असलेल्या नव निर्वाचित नगराध्यक्षा मिराताई भुषण मापारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
सर्व सत्कार मूर्ती आणि मंचावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होताच अनुराधा बनमेरू यांनी स्वागत गीत गायीले नगराध्यक्षा मिराताई मापारी यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर लोणार तालुक्यातील पहिल्या महिला सदस्य वैद्यकीय अधिकारी सन्माननीय डॉ. छायाताई मापारी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प.पू.श्री चैतन्यश्रीजी म. सा. यांची सांसारिक विरमाता प्रमिलाबाई तिलोकचंद रुणवाल यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या आधुनिक जगात
एकत्र राहणे झाले फार दुर्मिळ अश्याच एका आदर्श कुटूंबातील चार जावांचा इंदूताई प्रकाश मापारी,
शालिनीताई राजेश मापारी, वैशाली नंदकिशोर मापारी, संगीता विनायक मापारी या सर्वांचा कौतुकपर शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य सुनीताताई अनिल मापारी शिवाजी शिक्षण संस्था लोणार शिक्षक प्रमुख पदी नियुक्ती बद्दल अभिनंदन पर शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सह सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात, नारीशक्ती ग्रुप च्या अध्यक्ष स्मिताताई विक्रांत मापारी यांचा सत्कार करण्यात आला श्रीमती मंगलाताई इरतकर यांची हलाखीची परिस्थिती पतीच्या निधना नंतर शाळेवर मदतनीस म्हणून काम करून दोन्ही मुलांना उच्च शिक्षा विभुषित करून चांगल्या पदी नियुक्ती केली त्याच्या सेवानिवृत्ती बाबत त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .शिलाताई गजानन मुढे यांच्या कन्या हिने शैक्षणिक उच्चाक गाठून समाजात नाव लौकिक मिळवला त्या बद्दल शिलाताई चा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या नंतर वेळ मिसेस व मिस लोणार स्पर्धा याचे निकालाची यात शितल राऊत ,सलोनी शुभम इंगळे , श्वेता आर्या ,रुपाली चोपडे तर प्रोत्साहन पर ज्योती सुरडकर यांनी बक्षीस पटकावले मिस लोणार स्पर्धा मध्ये धनश्री वसंत पवार ,वैष्णवी जायभाये, चहक बगडिया ,आराध्या गजानन मापारी तर प्रोत्साहन पर गौरी राहुल मापारी यांनी बक्षीस पटकावले,
नारिशक्ती ग्रुप मनोरंजन तर करतेच सोबतच तळागाळातील महिलांना स्टेज मिळण्याकरता दरवर्षी विविध स्पर्धाचे ही आयोजन करते,आपली संस्कृती जोपासण्या करता याही वर्षी भजनी मंडळी नी भजन, भारूड सादर केले त्यात विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ ,महादेव भजनी मंडळ ,दुर्गा भजनी मंडळ यांनी ही बक्षीस पटकावले सौ स्मिता विक्रांत मापारी यांचे अध्यक्ष भाषण झाले प्रास्ताविक डॉ.अनुपमा झोरे मनोगत नारिशक्ती चे यावर दोन शब्द डॉ.प्रतीक्षा सरकटे नारिशक्ती ला शक्ती मिळावी यावर कविता स्वाती शेजोळ यांनी म्हटली सूत्रसंचालन वैशाली देशमुख सह वृषाली देवानंद चौधरी यांनी केले खेळाचे नियोजन श्वेताताई सिंगी व सीमाताई घेरवरा यांनी केले तर लकी ड्रा चे नियोजन निता बगडिया व कीर्ती बगडिया यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उर्मिला विभुते यांच्या शब्दानी केले, सर्व नारीशक्ती महिला मंच ग्रुप सदस्य कार्यक्रमात सहभागी होतेच, लोणार मधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला दिनाचा बहारदार असा कार्यक्रम नारीशक्ती ग्रुपच्या माध्यमातून सलग पाचव्या वर्षी सादर करण्यात आला.

Post a Comment
0 Comments