मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे रमजान ईद निमित्त ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हिंदू बांधव यांनी उपस्थित राहून रमजान ईद च्या निमित्ताने नवाज नंतर स्नेहभोजन व सरबताची व्यवस्था केली. यावेळी असंख्य हिंदू बांधव तसेच मुस्लिम बांधव यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यातून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे निदर्शनास आले यावेळी युवासेना तालुका उपप्रमुख एकनाथ खराट यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देऊन स्नेहभोजनाचे दान दिले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments