Type Here to Get Search Results !

आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला माजी आमदार डॉ.संजय रायमूलकर यांचा मदतीचा हात


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे लागलेल्या भीषण आगीत किराणा दुकान पूर्णतः जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेनंतर माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कुटे कुटुंबियांची भेट घेतली.

या कठीण प्रसंगी धीर देत माजी आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी कुटे कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून ₹३१,०००/- ची आर्थिक मदत दिली. तसेच भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, उपसभापती कारभारी सानप,विठ्ठलराव जाधव,डॉ.पंजाबराव घुगे,शिवानंद सांगळे,संतोष सांगळे,अभिमन्यू सांगळे,पंढरी सांगळे,साहेबराव पाईकराव सर,दुनियादास कांबळे,रामकिसन सांगळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments