Type Here to Get Search Results !

श्री संत गजानन महाराजांनी" माणसाला माणसासारखे जगणे शिकविले - श्री स्वामी साधन चैतन्यजी महाराज


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

  शेगावीचा राणा श्री संत गजानन बाबा यांची लीला फार महान असून बाबांनी अक्षरशः उष्ट्या पात्रळवाळिवरील अन्न वेचून खाल्ले आहे.म्हणजेच त्यांनी अन्नाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले आहे.आणि त्यांनी माणसाला माणसासारखे जगायचे सुद्धा शिकविले आहे. त्यांच्या या लिले मुळे आज सुद्धा शेगाव येथील गजानन बाबांच्या संस्थांमध्ये दररोज लाखो भाविक प्रसादाचे श्रवण करीत असतात.

        असे अनेक उदाहरण देऊन परमपूज्य श्री श्री 1008 स्वामी साधन चैतन्यजी महाराज देऊळगाव कूंडपाळ यांनी दिनांक 21 मार्च 2026 रोजी श्री संत गजानन महाराज सेवाभावी वारकरी शिक्षण संस्थांची दरवर्षीप्रमाणे अंजनी खुर्द ते शेगाव श्रीराम नवमी निमित्ताने पाई वारीच्या पहिल्याच मुक्कामावर मेहकर येथे आपल्या मधुर वाणीतून कीर्तन सेवा देऊन सांगितले. यावेळी पायी दिंडी मधील अनेक भक्तांसह मेहकर येथील संध्याकाळचे अन्नदाते वारकरी भवन व श्री विठ्ठल धाम मंदिर मेहकर व श्री निराज रायमुलकर,वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष रामदास महाराज धांडे व संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

       या पालखीचे प्रस्थान दिनांक 21 मार्च रोजी अंजनी खुर्द येथून झाले तर दिनांक 26 मार्च रोजी शेगाव येथे प्रारंभ होणार आहे.मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचे अनेक ठिकाणी स्वागत होऊन प्रत्येक ठिकाणी भक्तांसाठी चहा पाण्याचे,फराळाचे व जेवणाचे नियोजन अनेक वेगवेगळ्या भक्तांनी वाटून घेतले आहे.तर दररोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन सौजन्य देऊन भक्तांना त्यांच्या हरिकीर्तन सेवेचे श्रवण दिल्या जाते त्यामुळे या पालखीचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत असून नियोजन सुद्धा पाहण्याजोगे आहे.

Post a Comment

0 Comments