मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तहसील कार्यालय येथे 17 मार्च रोजी महसूल विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक, यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान, आपत्तीनंतर., याविषयी खबरदारी, तत्परता, उपायोजना याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण एन. डी. आर. एफ. पुणे येथील फुंदे आणि एस. डी. आर. एफ .नागपूर येथील भंडारे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश मडके आणि अप्पर तहसीलदार प्रशांत सानप यांनी सदर आपत्ती व्यवस्थापन तत्परता विषयी सविस्तर प्रास्ताविक केले.याप्रसंगी नायब तहसीलदार अजय पिंपरकर, नायब तहसीलदार विवेक नालट, निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख हे उपस्थित होते. आणि मेहकर, लोणार तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी महादेव सदार यांनी आणि आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर यांनी केले.या कार्यक्रम साठी खुळे, राठोड, ढाकरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments