Type Here to Get Search Results !

मेहकर बस स्थानकासाठी १५ बसेस उपलब्ध करून देणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माजी आमदार डॉ.संजय रायमूलकर सदिच्छा भेट घेऊन त्यांना मेहकर येथील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली.

मेहकर बस स्थानकाचे काम पूर्णत्वास जात असून त्या अनुषंगाने बस स्थानकासाठी १५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मेहकर बस स्थानकासाठी १५ नविन बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनानंतर बस स्थानकाच्या लोकार्पणासाठी योग्य तारीख निश्चित करून कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत,आमदार अनिल बोंडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments