Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन केला वाढदिवस साजरा


मेहकर, लोकतंत्र न्यूज 

शेलगाव देशमुख येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वैभव पातुरकर यांनी वाढदिवस साजरा केला.आज-काल वाढदिवसावर मोठ्या प्रमाणात खर्च करून वाढदिवस साजरी करण्यात येतात यामध्ये मोठे मोठे बॅनर छापने, मित्रांना पार्ट्या देणे, वेगवेगळे इव्हेंट करणे अशा प्रकारची वाढदिवस साजरी होतात परंतु शेलगाव देशमुख येथील युवक वैभव पातुरकर यांनी या सर्व प्रकाराला फाटा देत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. 

यावेळी ज्येष्ठ नेते संपतराव, देशमुख सरपंच पती दिलीप आखरे ,उपसरपंच विनोद गोरे, ग्रामपंचायत सदस्य पती नारायण खोडवे, युवा नेते उत्तम दत्तात्रय आखरे, सदस्य पती विनोद खंडारे, लक्ष्मण तोतरे, मुख्याध्यापक बुटे, शिक्षक कुबडे, भाकडे व शिक्षिका माळवदे सह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments