Type Here to Get Search Results !

धम्मगिरी बौद्धविहार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

बुलढाणा शहरातील मलकापूर रोड स्थित धम्मगिरी बौद्ध विहार येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा स्वीकृत नगरसेवक सुनील सपकाळ, मोहन पऱ्हाड, अरविंद होंडे हे होते, विशेष उपस्तिथी मध्ये भीमराव जाधव, आर के इंगळे, विद्यासागर मिसाळकर, दिलीप वाघमारे तर उपस्तिथी मध्ये एस.यु.बावस्कर, पी.आर. इंगळे, मंगल मिसाळ, भैय्यासाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, अशोक दाभाडे, विजय राऊत, संजय कस्तुरे, विजय वाकोडे, सुनील धुरंधर, सुभाष साबळे, प्रेम इंगळे, सुरेश सरकटे, मिलिंद वानखडे, प्रिन्स हिवाळे, दादाराव पगारे, झिने साहेब, अर्चना जाधव, सुजाता हिवाळे इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments