Type Here to Get Search Results !

ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन


मेहकर, लोकतंत्र न्यूज 

ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर समस्या सोडविण्यासाठी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी मेहकर तालुका अध्यक्ष परमानंद अवसरमोल यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 १) ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे.२) ग्रामस्तरावर मस्टर काढण्यासाठी युझर आयडी, पासवर्ड मिळणे.३) ज्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामरोजगार सहाय्यक नाही तेथे नवीन ग्राम रोजगार सहाय्यकाची नियुक्ती करणे.४) ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या ऐवजी इतर कर्मचारी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांऐवजी त्या पदावर ग्रामरोजगार सहाय्यकांची निवड करणे.५) जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये ग्रामरोजगार सहाय्यकांना कामाचे मानधन दिल्या जात नाही. यासंदर्भात आपले स्तरावरून कार्यवाही करणे.६) स्थानिक APO आणि CDO तसेच PTO यांची बदली करून इतर तालुक्यातील APO आणि CDO व PTO यांची निवड करणे.७) राजकीय हेतूने विनाकारण पदावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकांना परत पदावर घेणे.८) जिल्ह्यातील ज्या ग्रा. प. मध्ये राजकीय हेतूने दुय्यम रोजगार निवडले आहे.त्यांची नियुक्ती रद्द करणे.

यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मागण्या मान्य झाल्या नाही तर २० फेब्रुवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीमंत देशमुख,तालुका उपाध्यक्ष किशोर निकम, तालुका सचिव विष्णु राठोड, जिल्हा संघटक संजय मोरे, मार्गदर्शन श्रीकिसन तांगडे, प्रविण ठोकळ , सुरेश राठोड,सोनी शर्मा,बिबीशन राठोड, सतिष राठोड, सुनिल राठोड, संतोष राठोड, संदीप टेकाळे सह ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments