Type Here to Get Search Results !

रमेश नरोडे लिखित भावनांच्या लाटा चे प्रकाशन


देऊळगाव राजा, लोकतंत्र न्यूज 

देऊळगाव राजा शहरातील सुप्रसिद्ध कवी रमेश नरोडे यांच्या भावनांच्या लाटा या कवितासंग्रहाचे दि २३ फेब्रवारी रविवारी ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रभाकर शेळके यांच्या हस्ते व भाष्यकार डॉ. भगवान खरात व श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव, के पी खांडेभराड, गोविंद बोरकर यांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन झाले.

 शहरातील विरूंगळा भवन येथे आयोजित भावनांच्या लाटा या कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी यांच्यासह कवी रमेश नरोडे यांची उपस्थितीत संपन्न झाले.प्रकाशन सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.ज्योती देशमुख यांनी केले. प्रास्ताविक के. पी. खांडेभराड यांनी केले. आभार मधुकर शेळके यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रमेश नरोडे व सौ. रत्नमाला नरोडे या दाम्पत्याचा सत्कार केला. 

             प्रकाशन सोहळ्यानंतर जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता ' मुशिरखान कोटकर,डॉ. ज्योती देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.यामध्ये प्रा.सुभाष मगर, शेख बिस्मिल्ला सोनोशी,जयदीप विघ्ने, प्रा.अश्विनी जाधव मेहेत्रे, 

ॲड.वर्षा कंकाळ, विजय दळवी, अरविंद कुलकर्णी, सुखदेव साळवे, नंदलाल शर्मा, डॉ. भगवान खरात, सुधाकर डोईफोडे यांनी कविता सादर केल्या. 

    याप्रसंगी पत्रकार मुन्ना ठाकूर, अशोक डोईफोडे , अहिरेसर , नीरज पारिख ,अल्ताफ कोटकर, सुजित गुप्ता ,सय्यद समीर, राजेश भन्साली , दिनकर जाधव ' बाबुलाल शिवरकर,,, दंदालेसर प्रसाद सावरकर, सुधीर जाधव , सपाटे , सचिन मापारी यांच्यासह रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments