Type Here to Get Search Results !

संत गाडगेबाबा यांची जयंती परिट समाजाच्या वतीने साजरी


देऊळगाव राजा, लोकतंत्र न्यूज 

अज्ञान , अस्वच्छता , अंधश्रद्धेत बुरसटलेल्या समाजाला, किर्तन आणि कृतीच्या माध्यमातून उन्नतीचा मार्ग दाखवणारे तसेच संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे थोर संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती सोमवारी परीट समाज देऊळगाव राजा यांच्या वतीने शहरातील माळीपुरा परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी परिसर स्वच्छता -संत गाडगेबाबा यांच्या फोटो प्रतिमेला विनम्र अभिवादन परिट समाज व मान्यवरांनी केले . सायंकाळी भजन व महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता झाली .संत गाडगेबाबा जयंती निमित्त माळीपुरा परिसरातील रंगार गल्ली परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यानंतर येथे परिट समाजाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात विविध पुष्पांनी सजवलेली संत गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन ह भ प संत चरणदास निकम महाराज गुरुजी व उपस्थित मान्यवर व परीट समाजाचे बंधू-भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले .सदर अभिवादन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते तुकाराम खांडेभराड,नगरसेवक राजेश भुतडा , विष्णू झोरे , दीक्षा खांडेभराड , किशोर खांडेभराड , पवन झोरे ,दीपक बोरकर ,आकाश कासारे, संतोष खांडेभराड,प्रदीप वाघ , गोविंद तिडके, बबनराव कासारे . बंडू झोरे, गिरीष वाघमारे ,सुरज खांडेभराड, ओम खांडेभराड , पत्रकार सुरज गुप्ताआदी मान्यवरांनी अभिवादन केले .याप्रसंगी मान्यवरांनी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतून प्रकाश टाकला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरज गुप्ता यांनी केले.दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी गाडगेबाबा यांच्या फोटो प्रतिमे समोर पूजन करून अभिवादन केले.सायंकाळी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली . संत गाडगेबाबा जयंती उत्सवाचे आयोजन परित समाजाचे बंधू-भगिनी देऊळगाव राजा यांनी केले होते .

Post a Comment

0 Comments