Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन खंडारे यांची निवड


बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देणारी संघटना ग्रामीण पत्रकारांच्या अडीअडचणी व त्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संघटना म्हणून महाराष्ट्र राज्यात परिचित असलेली पत्रकारांची एकमेव संघटना म्हणजेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना होय अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी दैनिक भारत संग्राम चे जिल्हा प्रतिनिधी तथा दैनिक परतवाडा टाइमचे जिल्हा प्रतिनिधी व दैनिक महासागर चे सिनखेडराजा तालुका प्रतिनिधी सचिन खंडारे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे 'दिनांक 15 फेब्रुवारी रोजी एसीएस हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने व प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे यांनीही निवड केली आहे '

सदर बैठकीला पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रताप मोरे तसेच पश्चिम विदर्भ संघटक प्रल्हाद देशमुख , पत्रकार समाधान सरकटे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख , जिल्हा सहसचिव पठाण , सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष गणेश पंजरकर ' जिल्हा संघटक अशोक खरात ' राजू मोरे यावेळी उपस्थित होते '

Post a Comment

0 Comments