मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत रोजगार हमीच्या कामकाज करण्यासाठी व ग्रामपंचायत अधिकारी यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमीच्या कामात सातत्य व ग्रामपंचायत अधिकारी यांना मदत करण्यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक हा नेहमी तत्पर असतात या ग्राम रोजगार सहायकाच्या समस्या सोडवण्यासाठी तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटना कार्यरत असते. मेहकर पंचायत समिती कार्यालय येथे १३ फेब्रुवारी रोजी ग्रामरोजगार सहायक संघटनेच्या मेहकर तालुका अध्यक्षपदी परमानंद अवसरमोल ,उपाध्यक्षपदी किशोर निकम, सचिव पदी विष्णू राठोड , सहसचिव पदी लक्ष्मण ताजणे तर मार्गदर्शन म्हणून श्रीकिसन तांगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामरोजगार सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख, जिल्हा संघटक संजय मोरे सह तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments