Type Here to Get Search Results !

बेलगाव येथील हिंमतराव गुलाबराव देशमुख यांनी ७० व्यावर्षी केली नर्मदा परिक्रमा पूर्ण


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील हिम्मतराव गुलाबराव देशमुख यांनी नर्मदा परिक्रमा हि मध्यप्रदेश,महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतील सुमारे पायी प्रवास ३५०० ते ४००० किमी अंतर त्यांनी खुप थंडी असताना सुद्धा हार मानली नाही तिन ते चार महिन्यांचा पायी प्रवास पूर्ण करुन गावा मध्ये येताच गावातील ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. ओंकारेश्वर पासून नर्मदा परिक्रमेची सुरुवात रोज २५ ते ३० किलोमीटर पायी चालत ३ ते ४ हजार किलोमीटर अंतर चार ते पाच महिन्यांत पूर्ण केले. जंगले, खेडी, आदिवासी पाडे यातुनच बहुतांश प्रवास केला गावकरी जे देतील ते भोजन करत विविध आश्रम नदी काठावर थांबत हि यात्रा केली एकुण ८०० ते १००० छोट्या नद्या ओलांडल्या असे हिंमतराव देशमुख यांनी सांगितले भाषेच्या गंमती भेटलेले साधु आश्रमांची माहिती शेतीतील फरक उत्पादने प्राणी.पक्षी.औषधी वनस्पती याची माहिती त्यांनी दिली परिक्रमेतील १०० ते २०० हुन अधिक छायाचित्रे दाखवत त्यांनी हे अनुभव मांडले कमी गरजा मध्ये जगता येते हा वस्तूपाठ नर्मदा परिक्रमा संसारी माणसाला देते एक नव्या जीवनशैलीचा परिचय होतो आत्मचिंतनाची सवय लागते तसेच जगण्यात तटस्थ भाव निर्माण होतो असे हिंमतराव देशमुख यांनी सांगितले हा वस्तू पाठ नर्मदा परिक्रमा संसारी माणसाला देते एक नव्या जीवनशैलीचा परिचय होतो आत्मचिंतनाची सवय लागते तसेच जगण्यात तटस्थ भाव निर्माण होतो. परिक्रमेचा संकल्प केला होता शारीरिक कष्ट अडचणी आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्यांनी ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली त्याच्या आगमना निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर बेलगाव मध्ये ढोल ताशा वादक यांच्या गजरात स्वागत करण्यात आले या मध्ये गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला रांगोळी काढली पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पत्नी सौ कांता हिंमतराव देशमुख यांनी औक्षण करून परिक्रमावासीयाचे स्वागत केले या सोहळ्याला वारकरी संप्रदाय ग्रामस्थ महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments