Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह यांनी भूषविले.

प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र पडसकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी, ज्येष्ठ नेते नाझिम भाई कुरेशी ग्रा प सदस्य जोईप खान, दिलुभाई ठेकेदार, जावेद खान ठेकेदार ,जलाल खान, राजेश जाधव, बाबर देशमुख ,आसिफ खान ,रजिक खान ,रब्बानी शाह ,मोहसीन खान ,साबीर खांन तसेच डोणगाव येथील पत्रकार बांधव जमीर शहा ,जमील पठाण, यासीन बेग, हमीद मुल्लाजी,अबरार मिल्ली उपस्थित होते. कार्यक्रमास असंख्य पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या नवीन रंगमंचाच्या उद्घाटनाने करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीते, नाटिका, समूह नृत्य आणि प्रबोधनात्मक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहमय झाले होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रब्बानी यांनी केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर अहमद अन्सार अहमद यांनी प्रभावीपणे केले.

अध्यक्षीय समारोप करताना सद्दाम शाह यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मो. जाकीर, रफिक खान, मो. कलीम, वसीम खान, असलम अली, शेख मुजीब, शेख इरफान, अजहर देशमुख, रुकय्या बेगम व गजाला मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments