Type Here to Get Search Results !

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

 


डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित ,डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.राठोड उपस्थित होती. प्रमुख वक्ता म्हणून भक्ती वानखेडे वर्ग 7 ची विद्यार्थिनी उपस्थित होती. विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव , शिक्षक सरकटे , संजय गवई , गव्हले , कुटे मॅडम, कुलकर्णी मॅडम, गायकवाड मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनमोहक डोळ्याला भुरळ पाडणारी अशी स्वामी विवेकानंद यांची भूमिका व राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारली .

प्रमुख वक्ता म्हणून वर्ग 7 ची विद्यार्थिनी कु. भक्ती वानखेडे हिने प्रभावीपणे आपले विचार व्यक्त केले. तिने राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला संघर्ष , त्या संघर्षातूनच स्वराज्य स्थापन झाले. शिवरायांनी केलेले कार्य तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना सांगितला.

यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबाबत गीत गायन, भाषण, पोवाडे सादर केले. 

विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणातच माँसाहेब जिजाऊनी शूरवीर पुरुषांच्या गोष्टी सांगून शिवरायांना शत्रूंचा बिमोड करण्याचे व हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेला सुखी करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना रणांगणात उतरवले. आणि माँसाहेब जिजाऊ चे स्वप्न शिवबाने पूर्ण केले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर सरांनी प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंद यांनी दिलेली शिकवण आपण नेहमी स्मरणात ठेवून आजच्या जयंतीनिमित्त आपण त्यांनी दिलेली शिकवण नेहमी स्मरणात ठेवावी. अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन गायकवाड मॅडम यांनी केले. 

शेवटी पसायदानाने अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी तथा शिक्षकेतर कर्मचारी बंधू या सर्वांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments