डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,डोणगाव.येथे हळदी कुंकूवाचे औचित्य साधून 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 2 वाजता सप्तशक्ती संगम-मातृसंमेलन हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सौ. अपर्णाताई पिंपरकर होत्या.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अश्विनीताई मेटांगळे उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ता म्हणून सौ. वैशालीताई आंबेकर उपस्थित होत्या.
विशेष उपस्थितीमध्ये प्राचार्य रमेश जाधव सर, सुवर्णाताई कुलकर्णी मॅडम, शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल सर, सौ. सारडा ताई उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत कु. ईश्वरी वानखेडे व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत कु. वेदिका आखाडे या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वतीच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला.
यशस्वी माता-पालक म्हणून सौ. कमलताई विजय राऊत व सौ.अर्चनाताई किशोर बुरखंडे या दोन मातांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्राचार्य रमेश जाधव सरांनी सांगितले की प्रत्येक कुटुंबामध्ये मातीची भूमिका ही फार महत्वाची असते व निर्णायक असते त्यामुळे प्रत्येक मातेने स्वतःच्या पाल्याकडे स्वतः जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. आपली शाळा ही सदैव सतर्क आहे त्यामुळे शाळा व माता पालक यांच्यामध्ये योग्य दुवा साधला जात आहे आणि यातून आपल्या विद्यालयातून संस्कारक्षम विद्यार्थी अगदी पूर्वीपासूनच घडत आहेत.
डॉ. सौ अश्विनीताई मेटांगळे यांनी मातेची कुटुंब व समाज घडविण्यातील प्रमुख भूमिका सविस्तर स्पष्ट केली.
तसेच सौ.वैशालीताई आंबेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की मोबाईलचा अधिक वापर होत असून त्यातून उद्भवणारे धोके हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे मोबाईल पासून शक्य तितके दूर राहणे हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
त्यानंतर सुवर्णाताई कुलकर्णी मॅडम यांनी सप्तशक्तीसंगम या संकल्पनेविषयी माहिती देतांना माहेश्वरी , कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुंडा, इंद्राणी,ब्रह्मणी या सप्तशक्तींचे सविस्तर विवेचन केले. या सप्तशक्तीचे प्रतीक स्त्री-शक्ती आहे. प्रत्येक माता या शक्तीचा अंगीकार करून सुदृढ समाज निर्माण करू शकते.
नंतर स्त्रीशक्ती आधारित गीत वर्ग 7 वीच्या विद्यार्थिनींनी सादर केले.
आलेल्या सर्व माता-भगिनींना हळदीकुंकू व तिळगुळ देण्यात आला.
सर्वात शेवटी सौ.अपर्णाताई पिंपरकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
आलेल्या मातासोबत चर्चा झाली.
नंतर मजेशीर उखाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखुताई मापारी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्रीताई पाटील मॅडम यांनी केले.
सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments