Type Here to Get Search Results !

शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेचा वारसा जोपासत आहोत - ॲड शिव ठाकरे पाटील


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

जानेफळ येथे १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीच्या ०५ व्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. 

विवेकानंद अर्बन आणि विवेकानंद फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेचा जो वारसा आम्ही जोपासत आहोत, त्याला अधिक बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे मत भाजप नेते तथा विवेकानंद अर्बन आणि विवेकानंद फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड शिव ठाकरे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजप आध्यात्मिक आघाडी विर्दभ प्रदेशाध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमोद बापू देशमुख जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार,भाजपाचे ज्येष्ठ नेते सतिष कुलकर्णी ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, विवेकानंद अर्बन परिवाराचे अध्यक्ष ॲड शिव ठाकरे पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, वैष्णवी अर्बनचे अध्यक्ष शिवशंकर गायकवाड, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चनेवार ,भाजपा तालुका अध्यक्ष संदीप वानखेडे , शेतकी संस्थेचे संचालक प्रशांत काळे,पत्रकार अनिल मंजुळकर,उद्धव फंगाळ , विष्णू आखरे होते. ज्येष्ठ संचालक विजयराव जवंजाळ,अशोकराव निकस,स्थानिक संचालक प्रभाकर ढोणे, होनाजी महाराज, गिरीश शेळके, सतीश निकम,अनिल जैन,रवी मोहरुत,परशुराम ठाकरे,उपसरपंच आकाश मोसंबे,डॉ.दत्ता राखोंडे मंचावर उपस्थित होते. यांच्यासह मेहकर-लोणार तालुक्यातील पत्रकार बांधव, पतसंस्थेचे सभासद, ग्राहक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विवेकानंद अर्बन बँकेच्या व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांनी परिक्षम घेतले.

Post a Comment

0 Comments