मेहकर,लोकतंत्र न्यूज नेटवर्क
राज्य परिवहन महामंडळा तर्फे दरवर्षी 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत इंधन बचत मोहीम राबविले जाते.याच अनुषंगाने बुलढाणा विभागातील मेहकर आगारामध्ये 16 जानेवारी 2026 रोजी इंधन बचत मोहिमेला सुरुवात करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मेहकर आगारातील सर्व चालकांना इंधन बचत करण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक हर्षल साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय लेखा अधिकारी बुलढाणा तथा पालक अधिकारी मेहकर आगार अनिल बहिरम हे होते.तर कार्यक्रमाचे उद्घाटक यंत्र अभियांत्रिकी, डॉ.आर.एन.लाहोटी, तंत्रनिकेतन सुलतानपूर चे प्राध्यापक गणेश खरात आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक दिनेश भालेराव हे होते.
मेहकर आगाराचे वाहनांचे मायलेज प्रतिकिलोमीटर 10 लिटर म्हणजेच 47 हे बुलढाणा विभागात सर्वात जास्त असल्याचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल देशमाने यांनी सांगितले.तर बस चालवतांना घ्यावयाची दक्षता,देखभालीचे महत्व आणि थेंबा थेंबाने तळे साचत असते त्याचे महत्त्व अनिल बहिरम यांनी चालकांना समजावून सांगितले,एक व्यक्ती तीन कि.मी.अंतर पैदल चालून दरवर्षी 6160 लिटर पेट्रोलचा खर्च वाचवितो.असे गणेश खरात यांनी आपल्या मार्गदर्शनात उदाहरणे देऊन सांगितले,खनिज तेलाचा पुरवठा दिवसेंदिवस कमी होत असून तो चिरकाळ पुरेल याचा विचार करावा आणि जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा.असे दिनेश भालेराव यांनी सुचविले.तर अध्यक्षीय भाषणातून हर्षल साबळे यांनी प्रत्येक चालकांना दररोजचे एक लिटर डिझेल वाचविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमांमध्ये मेहकर आगारातील चांगले के.पि.टि.एल. आणणाऱ्या चालकांचा आणि चांगले उत्पन्न आणणाऱ्या वाहकांचा सत्कार करण्यात आला तसेच.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहकर आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व डिझेल वाचविण्याची सुद्धा शपथ घेतली.

Post a Comment
0 Comments