मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथे जो जनता दर्बार घेतला होता. त्यामध्ये पंचायत समिती मेहकर यांच्या अंतर्गत असलेले विषय सारशिव येथील जन हिताच्या मागण्या पुर्ण न झाल्यामुळे प्रविण राजगुरु,पत्रकार मनिष जाधव व पंकज वाघ यांनी १९ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय, मेहकर समोर अन्नत्याग अंदोलन करत आहे. सारशिव येथील हिंदु स्मशानभूमीची ६० आर जमिन खुली करुण हिंदु समाजाच्या ताब्यात देण्यात यावी.सारशिव येथील हिंदु समाजाला ६० आर जमिन राखीव असुन त्यावर बेकायदेशीर पणे झटका मशिन लावण्यात आलेली आहे. ती तात्काळ काढण्यात यावी. जिल्हा परिषद शाळा सारशिव भवतालील केलेले अवैद्य अतिक्रमन तात्काळ काढून जिल्हा परिषद शाळा खुली करुन देण्यात यावी. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments