मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील गणेश चव्हाण यांची भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन द्वारा संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या मेहकर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांनी दिनांक 20 जानेवारी रोजी सदर निवड पत्र देऊन निवड केली आहे.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती संपूर्ण देशभरात कार्यरत असून ज्या ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते त्या फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय व त्यांचे हक्क मिळून घेण्यासाठी सदर समिती कार्यरत आहे. निवड झाल्याबद्दल गणेश चव्हाण यांनी सांगितले की बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असते कृषी केंद्र असेल पेट्रोल पंप असेल मोबाईल दुकान असेल कापड दुकान असेल अशा सर्व ठिकाणी ग्राहकांच्या आलेल्या तक्रारीवरून त्यांना त्यांची हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी मेहकर तालुक्यात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सक्षम ग्राहक कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांचे निवडीबद्दल विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ पदाधिकारी सुनील अंभोरे, डॉ .गंगाराम उबाळे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments