सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची प्रभावी आणि उत्कृष्ट भूमिका असलेला पेटला वणवा क्रांतीचा हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नाही, तर तो समाजजागृतीचा व महत्त्वाचा संदेश देणारा सशक्त माध्यम आहे.उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची ताकदवान भूमिका आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कथा घेऊन पेटला वणवा क्रांतीचा हा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. हा केवळ चित्रपट नसून एक चळवळीचा आवाज आहे. जो अन्याय, विषमता आणि अन्य समस्यांवर प्रकाश टाकतो. आपण सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या मित्रपरिवारासह हा चित्रपट नक्कीच बघावा. चला, परिवर्तनाच्या या वणव्यात आपणही सहभागी होऊया.सिंदखेड राजा येथे येत्या सोमवारी 15 डिसेंबर पर्यंत सिनेमा राहणार आहे.

Post a Comment
0 Comments