Type Here to Get Search Results !

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे - माजी राज्यमंत्री सुबोध सावजी


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

 ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व शिक्षण प्रवाहामध्ये मुले व मुली आल्या पाहिजेत या दूरदृष्टी कोणातून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित ग्रामीण भागातील डोणगाव ,शेलगाव देशमुख, विश्वी आदी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था सुरू केल्या त्यावेळी अल्पशा पगारावर ज्या शिक्षक वृंदांनी ज्ञानदानाचे कार्य करून शैक्षणिक क्षेत्रात संस्थेचा ठसा उमटवला आणि आज ते शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यामध्ये विश्वी येथील मुख्याध्यापक आत्माराम लक्ष्मण मोळवणे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापुर्ती सेवा गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन 16 डिसेंबर रोजी विश्वी येथील विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या प्रारंगणात आयोजित केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी होते तर सत्कार मूर्ती म्हणून आत्माराम मोळवने, पत्नी कांताताई आत्माराम मोळवणे.हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते, संस्था सचिव शैलेश सावजी, काँग्रेस नेते संतोष नरवाडे, बालचंद्र जाधव,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार शाह,शेलगाव देशमुख उपसरपंच विनोद गोरे, संजय चव्हाण, दिपक शेवाळे,नथू राठोड, पत्रकार विष्णू आखरे,नागेश गिऱ्हे, पत्रकार गजानन नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सेवा नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले सत्कार मूर्ती मुख्याध्यापक आत्माराम मोळवने यांचा सहपत्नीक सत्कार माजी राज्यमंत्री तथा संस्था अध्यक्ष सुबोध सावजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी उपस्थितना मार्गदर्शन करतांना म्हणाले की छोट्याशा लावलेल्या वृक्षाचे सर्व शिक्षक वृंदांनी ज्ञानदानाचे कार्य करून वटवृक्ष केला असून या वटवृक्षाच्या छायेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात आली आहेत शिक्षकांनी ज्ञानदानाच्या कार्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे ध्येय निश्चित ठेवावे असे मोलाचे मार्गदर्शन सुबोध सावजी केले.यावेळी वर्ग १० वी तील विद्यार्थीनी, सचिव शैलेश सावजी, पत्रकार विष्णु आखरे,सत्कारमूर्ती आत्माराम मोळवने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक गोपाल बोरा,मदन वामन पातूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव, मुख्याध्यापक दिलीप लाभांडे, मुख्याध्यापक विनायक डोळस,सरपंच पदी संजय चव्हाण,संजय अजगर, पत्रकार पुरुषोत्तम लोखंडे, गोपाल पाचपवार सह शेलगाव देशमुख, डोणगाव, वीश्वी शाळेचे सर्व शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments