मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
जिल्हा व सत्र न्यायालय मेहकर येथे १३ डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एका प्रलंबित मोटार अपघात दावा प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनी यांची आपसात तडजोड करण्यात आली. नुकसान भरपाईची रक्कम अर्जदार यांना कंपनीच्यावतीने देण्याच्या अटीवर प्रकरण आपसात मिटले. यावेळी लोकअदालत पॅनेल प्रमुख मा.श्री.सागर मुंगीलवार जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहकर पंच म्हणून ॲड. गोपाल पाखरे, अर्जदारातर्फे ॲड. सुधाकर अवचार. व इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड. राहुल एस. लामधाडे तसेच अर्जदार यांची उपस्थिती होती.
लोकअदालतमधून प्रलंबित प्रकरणात समेट घडून आणल्यास अर्जदार व गैरअर्जदार उभायतापक्षांचा वेळ व पैसा वाचतो याशिवाय न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा भार कमी होण्याससुद्धा मदत होते.

Post a Comment
0 Comments